चंदीगड : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद आता निवडणुकांमध्ये उमटायला सुरु झाले आहेत.
पंजाब मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला चांगल्याच जागा मिळाल्या आहेत. सेलिब्रिटी खासदार सनी देओल यांच्या गुरुदासपूर मतदार संघात तर काँग्रेसने २९ पैकी २९ जागा जिंकून भाजप आणि अकाली दल यांचा सुपडा साफ केला आहे.
याच पार्श्वभूमीवर अकाली दलाचे प्रवक्ते नरेश गुजराल हे “महाराष्ट्र देशा” सोबत बोलत होते. त्यांनी सांगितले की “काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पोलिसांनी आमच्या बऱ्याच लोकांना खासकरून अकाली दलाच्या नेत्यांना धमकावले. बऱ्याच ठिकाणी स्थानिक प्रशासनाने आमच्या लोकांची नामनिर्देशन पत्र देखील स्वीकारली नाहीत. अकाली दलाचे उमेदवार बघून थेट रिजेक्ट केलेत. त्यामुळे काँग्रेसने मिळवलेला हा विजय लोकशाहीची हत्या करून मिळवलेला विजय आहे.” असे गुजराल म्हणाले.
पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी ८ नगरपालिका, १०९ नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. विशेषतः भाजप खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघात असलेल्या सर्वच्या सर्व जागांवर भाजप पराभव झाला आहे. तर २९ जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
लोकसभा निवडणुकीत याच गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिकांनी भाजपला साफ नाकारले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीप्रकरणी एकनाथ खडसेंना पुन्हा तूर्तास दिलासा !
- स्वतःला बायकोचे ‘मालक’ समजणाऱ्यांना कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? – चित्रा वाघ
- ‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल – देवेंद्र फडणवीस
- याद राखा…विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही; मुनगंटीवारांचा इशारा
- पंजाब निवडणुकांत भाजप भुईसपाट ; शेतकरी आंदोलनाचे पडसाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

