अकोला : देशासह जगभरात कोरोनाना गेल्यावर्षी हाहाकार माजवला होता. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नातून भारतात लसींची निर्मिती करण्यात आली. सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डसोबत मिळून कोव्हिशिल्ड लस तर, भारत बायोटेकने स्वदेशी कोवॅक्सीन लसीची यशस्वीपणे निर्मिती केल्यानंतर गेल्या महिन्यात देशभरात लसीकरणाची सुरुवात करण्यात आली होती.
अकोल्यातून आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अकोल्यातील चतारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून लसीच्या सात बॉटल गहाळ झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून लस हाताळण्यात होत असलेला निष्काळजीपणावर काळजी व्यक्त केली जात आहे.
लस गहाळ झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. चोरी गेलेल्या लसीच्या बॉटल सिरम कंपनीच्या कोविशिल्डच्या आहेत. एका बॉटलमध्ये 11 मिली लस असते. आरोग्य विभागाने अद्याप याबाबत अधिक भाष्य केलेलं नाही. याआधी बोगस नावाने नोंदणी करून लसीकरण करून देण्यासाठी एजेंटगिरी फोफावल्याचे समोर आले होते.
तर, अनेकांना लसीसाठी नोंदणीकरण करण्याचे कारण देत आर्थिक गंडा देखील घालण्यात आल्याने आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता कोरोना लसीचा गहाळ झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही स्वतः लक्ष घालावं; हलगर्जीपणा करु नये’
- स्वतःला बायकोचे ‘मालक’ समजणाऱ्यांना कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? – चित्रा वाघ
- जावयाची वरात पोलिसांच्या दारात, सासरवाडीचे घर फोडून वीस हजारांवर डल्ला
- याद राखा…विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही; मुनगंटीवारांचा इशारा
- ‘प्रदेशाध्यक्षांच्या मिरवणुकीला कोरोना नसतो मात्र शिवजयंती वेळी कोरोना समोर येतो !’


