Share

ईडीप्रकरणी एकनाथ खडसेंना पुन्हा तूर्तास दिलासा !

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या व्यवहारामुळे खडसे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद त्यागावे लागले होते.

यानंतरच्या काळात एकनाथ खडसेंना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पुणे व नाशिकच्या प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. हा ४० कोटींचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याचं सांगितलं जात आहे.

या जमीन खरेदी प्रकारणामुळेच एकनाथ खडसे यांना ईडीशी सामना करावा लागत आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या उच्च न्यायालयातील याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसचं या चौकशीची व्हिडिओग्राफ करण्याची मागणी या याचिकेत आहे. तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंती खडसेंनी केली आहे.

आज या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. सुनावणी पूर्ण होई पर्यंत खडसेंवर कारवाई करण्यास ईडीला मनाई करण्यात आली आहे. आता, खडसेंना हा दिलासा २४ फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार आहे. आज न्यायालयातील युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने आता पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई हायकोर्टाने आता पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला ठेवल्याने तोपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करणार नसल्याची इडीची हमी कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!