पंजाब : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद आता निवडणुकांमध्ये उमटायला सुरु झाले आहेत.
विरोधकांनी शेतकरी आंदोलनाला विरोधकांनी सशर्त पाठिंबा दिला आहे. यात कॉंग्रेस अग्रेसर आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत, अशी तंबी दिली होती. संसदेच्या अधिवेशनात देखील शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला कौल दिल्याचे दिसतंय.
पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी ८ नगरपालिका, १०९ नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. विशेषतः भाजप खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघात असलेल्या सर्वच्या सर्व जागांवर भाजप पराभव झाला आहे. तर २९ जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
लोकसभा निवडणुकीत याच गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिकांनी भाजपला साफ नाकारले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही स्वतः लक्ष घालावं; हलगर्जीपणा करु नये’
- स्वतःला बायकोचे ‘मालक’ समजणाऱ्यांना कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? – चित्रा वाघ
- जावयाची वरात पोलिसांच्या दारात, सासरवाडीचे घर फोडून वीस हजारांवर डल्ला
- याद राखा…विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही; मुनगंटीवारांचा इशारा
- ‘प्रदेशाध्यक्षांच्या मिरवणुकीला कोरोना नसतो मात्र शिवजयंती वेळी कोरोना समोर येतो !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
