पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे कोरोनाची रुग्ण संख्या काही कमी होत नाही आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केलीय. दरम्यान, राज्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनत चाललं आहे. अशावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्य सरकार पुण्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्याचं अन्न व औषध प्रशासन झोपी गेलंय का? असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारलाय. पुणे शहरात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा भासत आहे. आम्ही रोज मागणी करतोय. पण त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोहोळ यांनी केलाय. पुणे शहराला रेमडेसिव्हीर मोठ्या प्रमाणात लागत आहे. हे माहिती असतानाही त्याला पुरवठा केला जात नाही. रेमडेसिव्हीर आणि व्हेंटिलेटर संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली आहे.
दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही कठोर पावले उचलली आहेत. आज रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच गोरगरीब जनतेचे जेवणाचे हाल होऊ नये म्हणून राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधाच्या काळात शिवभोजन मोफत देण्यात येणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदींना कधी एटीएमच्या किंवा बँकेच्या रांगेत पाहिलं आहे का? : राहुल गांधी
- सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही…संजय राऊत कर्नाटक प्रशासनाला भिडले
- आधी खात्यावर पैसे द्या मग लॉकडाऊन करा म्हणणाऱ्या चव्हाणांची भाषा बदलली, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…
- आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही – चंद्रकांत पाटील
- पंढरपूर पोटनिवडणुकीची सभा सुप्रिया सुळेंनी गाजवली, ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन ठोकल भाषण


