मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ.बलसरा यांनी एक यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा दुहेरी पेचात सापडलेल्या सुप्रिया सुळे यांनी वेळ पडल्यास एखादी स्त्री किती मल्टीटास्किंग होऊ शकते, याचा प्रत्यय आणून दिला. त्यांनी बुधवारी एक मुलगी आणि पक्षाची एक कार्यकर्ता या दोन्ही भूमिका अगदी चोखपणे पार पाडल्या. शरद पवार यांच्या आजारपणामुळे सुप्रिया सुळे यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात प्रत्यक्ष फिरून प्रचार करता आला नव्हता. मात्र, बुधवारी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरुनच व्हर्च्युअल सभा घेत पंढरपूरच्या मतदारांशी संवाद साधला.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित राहिले.मला या प्रचारसभेसाठी प्रत्यक्ष यायचं होतं परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता या सभेला ऑनलाईन उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. pic.twitter.com/DlQ3eGUA3D
— Supriya Sule (@supriya_sule) April 14, 2021
सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भालके नाना यांच्यासोबत आम्ही पंढरपूरचा चेहरामोहरा बदलायचे ठरवले होते. त्यामुळे भारत भालके आणि पंढरपूरासोबत आमचं एक वेगळं नातं होतं. मात्र, नाना अर्ध्या वाटेवर साथ सोडतील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे आता विश्वासाच्या नात्याने ही जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर सोपविली आहे. आता आपण नानांची अधुरी स्वप्नं पूर्ण करु. त्यासाठी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना मनसेने पाठिंबा दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत मनसे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आता मनसेची साथ मिळाल्याने भगीरथ भालके यांचे पारडे अजूनच जड झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बेन स्टोक्स स्पर्धेतून बाहेर, ‘या’ चार खेळाडूंपैकी एकाची लागू शकते संघात वर्णी
- ‘या’ कारणामुळे झाला कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव
- आखेरच्या चार षटकात बदलले सामन्याचे चित्र; मुंबईच्या गोलंदाजानी लढवली खिंड
- पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सची गुणतालीकेत भरारी; केकेआरची झाली घसरण
- मुंबई इंडियन्सने उभारली विजयाची गुढी ; केकेआरचा १० धावांनी केला पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

