सातारा : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 144 कलम लागू राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना, ‘आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा’, असा सल्ला मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना गरजू घटकांसह हातावर पोट असलेल्या (रिक्षाचालक, फेरीवाले, बांधकाम मजूर आदी) नागरिकांसाठी मदतीची घोषणा केली आहे.
एकीकडे विरोधकांनी या पॅकेजवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला असताना आधी पैसे जमा करा मगच लॉकडाऊन करा म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
‘राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये. राज्य सरकारची तिजोरी रिकामी असताना सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी पाच हजार चारशे कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना, शिवभोजन थाळी, रिक्षाचालकांना आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय क्रांतीकारक आहे. आपण कोरोना साखळी तोडू, अशी अपेक्षा आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच अभिनंदन करतो,’ असं भाष्य चव्हाण यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात आजपासून लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद ? वाचा एका क्लिकवर !
- परभणीमध्ये दोन पोलिसांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन
- सीबीएससीचा मोठा निर्णय ! दहावीची परीक्षा रद्द, १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली
- फडणवीसांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती, त्यांचं केंद्रात अजिबात वजन नाही – नाना पटोले
- ‘तुम केहना क्या चाहते हो?’ निलेश राणेंनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली


