बेळगाव : मराठी भाषिकांच्या हक्कासाठी व बेळगाव-निपाणी भागाचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी स्थानिक नागरिक गेली अनेक दशके महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत लढा देत आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असून १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
या जागेसाठी मराठी भाषिक एकवटले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके या युवकाने शड्डू ठोकला आहे. त्यांना मोठ्या दडपशाहीचा सामना करावा लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय तस तसा शेळकेंना मराठी भाषिकांचा मोठा पाठींबा मिळत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या मराठमोळ्या उमेदवाराला शिवसेनेनं जाहीर पाठींबा दिल्याचे घोषित केले होते. एवढच नाही तर दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी शुभम शेळकेंच्या प्रचारासाठी बेळगावात येण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ते आज बेळगावात दाखल झाले आहेत.
संजय राऊत हे संयुक्त महाराष्ट्र चौकात सभा घेणार आहेत. मात्र, व्यासपीठ कानडी प्रशासनाने तोडले असून आता मराठी भाषिक आणि प्रशासनामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सभा होणारच अशी गर्जना संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात. संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच!गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय.
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 14, 2021
‘बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात. संयुक्त महाराष्ट्र चौकातील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच!गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय.’ असं म्हणत संजय राऊत यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात आजपासून लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद ? वाचा एका क्लिकवर !
- येणारे दिवस अनिल देशमुखांसाठी कठीण असतील; भाजप नेत्याचे भाकीत
- आधी खात्यावर पैसे द्या मग लॉकडाऊन करा म्हणणाऱ्या चव्हाणांची भाषा बदलली, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…
- आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही – चंद्रकांत पाटील
- पंढरपूर पोटनिवडणुकीची सभा सुप्रिया सुळेंनी गाजवली, ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन ठोकल भाषण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

