Share

मोदींना कधी एटीएमच्या किंवा बँकेच्या रांगेत पाहिलं आहे का? : राहुल गांधी

Published On: 

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजप आणि तृणमूल यांच्यात जोरदार घमासान सुरु आहे. निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.

अशातच आता बंगालमधील चार टप्प्यांसाठी मतदान झाल्यावर आणि पाचव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालच्या प्रचारात एन्ट्री घेतली आहे. बंगालमधील या पहिल्याच प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

उत्तर बंगालमधील गोलपोखर येथून राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये आग लावत आहे. तर ममता बॅनर्जी या त्या आगीशी खेळ खेळत आहेत. रोजगार मिळावा म्हणून लाच दिली जाणारं हे पहिलच राज्य आहे. ममता बॅनर्जी म्हणतात निवडणुकीच्या वेळी खेळ होईल. (खेला होबे) कोणता खेळ? इथले रस्ते कोण बनवणार? खेळच करायचा आहे तर तो रस्त्यावरही करता येईल. येथे महाविद्यालये आणि विद्यापीठे कोण निर्माण करेल? खेळ खेळायचा आहे तर मैदानात खेळता येईल. राज्यात भाजप आणि टीएमसीकडून केवळ ड्रामा सुरू आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

तसेच त्यांनी यावेळी भाजपवर देखील घणाघाती टीका केलेली आहे. उत्तर प्रदेशात भाजपने आग लावली. त्यावर निवडणुका जिंकल्या. त्यानंतर काय झाले? आज उत्तर प्रदेशात काय होत आहे? कोरोना आला आहे. रुग्णालये मृतदेहांनी भरून गेले आहे. जिथे पाहावं तिथे लोक कोरोनाने मरत आहेत. सीएमला स्वत: काही कळत नाही. मोदींनी अर्ध्या रात्री नोटबंदी केली. लाखो लोक बरबाद झाले. मोदींना कधी एटीएमच्या किंवा बँकेच्या रांगेत पाहिलं का? लाखो रुपये किंमतीचा सूट परिधान करतात अन् म्हणतात ब्लॅकमनी विरोधात लढाई लढत आहोत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ पैकी चार टप्प्यातील मतदान नुकतचं पार पडलं. जसजसे मतदानाचे टप्पे पुढे जात आहेत तसा इथला प्रचार चांगलाच रंगात आला आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!