Share

आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही – चंद्रकांत पाटील

Published On: 

पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत भाषणा वेळी सत्तापालटाबाबत सूचक विधान केलं होतं.

यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील सरकार फार काळ टिकणार नाही असं विधान केलं आहे. ‘आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही.आम्हाला ते पाडण्यात रस नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत.’ असं पाटील म्हणाले.

यासोबतच, चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर गरजू घटकांसह हातावर पोट असलेल्या (रिक्षाचालक, फेरीवाले, बांधकाम मजूर आदी) नागरिकांसाठी घोषित केलेलं पाच हजार चारशे कोटी रुपयांच्या पॅकेजवर देखील टीका केली आहे. ‘हे पॅकेज फसवं आहे. या सरकारने दीड हजार रुपये मदत देऊन गोरगरिबांची चेष्टा केली आहे. दीड हजारात कुटुंबाचा खर्च चालतो का? लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. कोरोना संसर्ग साखळी तोडलीच पाहिजे. मात्र, मदत करताना अनेक घटकांचा विचार यात केलेला नाही,’ असं भाष्य चंद्राकांत पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!