मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात मविआ सरकारकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनावेळी “राज्यपाल हटाव , महाराष्ट्र बचाव”, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो” अशा घोषणा देण्यात आल्या. फक्त इतकेच नाही तर खाली डोके वरती पायच्या घोषणा देतांना आमदार संजय दौंड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शीर्षासन करून दाखवले.
दरम्यान, चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते.’ तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- ‘आदळ आपट करून वादळी अधिवेशन होत नाही’ – संजय राऊत
- नवाब मलीकांच्या अडचणीत वाढ, दाखल झाली अजून एक तक्रार…
- विराट कोहलीच्या १०० व्या कसोटी सामन्यासाठी गांगुली उपस्थित राहणार का नाही? आली मोठी अपडेट
- State Budget Session 2022 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन
- VIDEO : विराटला १००व्या कसोटी सामन्यासाठी सचिन तेंडुलकरकडून विशेष शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

