Share

VIDEO : विराटला १००व्या कसोटी सामन्यासाठी सचिन तेंडुलकरकडून विशेष शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विराट कोहली मोहालीच्या मैदानावर त्याचा १००वा कसोटी सामना खेळणार आहे. विराटच्या कारकिर्दीत या मैलाचा दगड ठरणाऱ्या सामन्याआधी त्याला भारतीय क्रिकेट जगतातील दिग्ग्ज खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहे. ज्यात सचिन तेंडुलकर (sachin tendulkar), वीरेंद्र सेहवाग, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा समावेश आहे.

बीसीसीआयने (bcci) विराट कोहलीला (virat kohli) या शुभेच्छा देण्यासाठी “लँडमार्क टेस्ट” च्या आधी शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. “१०० कसोटी क्लब मध्ये विराट कोहलीचे स्वागत आहे” असे या व्हिडिओचे कॅप्शन लिहले गेले आहे. ज्यात भारतीय क्रिकेट जगतातील या दिग्ग्ज खेळाडूंनी आपआपल्या शब्दात विराट कोहलीला या सामन्याआधी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. यात सचिन तेंडूलकर (sachin tendulkar) यांनी सांगितले “तुला १००व्या कसोटी सामन्यासाठी शुभेच्छा. मी तुझ्याबद्दल २००८ मध्ये ऐकले जेव्हा तू ऑस्ट्रेलियामध्ये अंडर १९ विश्वचषक खेळत होतास. तेव्हापासूनच तुझ्या नावाची चर्चा सुरु झाली होती. तू लोकांना प्रेरित करतोस आणि तेच तुझे सर्वात मोठे यश आहे”

१६८ कसोटी डावांमध्ये कोहलीने ५०. ४९ च्या सरासरीने २७ शतके आणि २८ अर्धशतकांसह ७९६२ धावा केल्या आहेत. माजी भारतीय कसोटी कर्णधारासाठी त्याच्या महत्त्वाच्या सामन्यात, पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) ने अलीकडेच स्टँडमध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्याबाबत आपली भूमिका बदलली आहे. एका निवेदनात पीसीएने खुलासा केला आहे की, कसोटी बंद दारांमागे खेळली जाणार नाही. चाहत्यांच्या मागणीमुळे या सामन्यात प्रेक्षक हजेरी लावणात आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!