Share

State Budget Session 2022 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आजपासून (३ मार्च) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. भाजपने विविध विषयांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पहिल्याच दिवशी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी (Nawab Malik resignation demand) भाजपकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन (Movement of BJP MLAs on the steps of Vidhan Bhavan) सुरु आहे. यावेळी भाजपकडून “दाऊद के दलालो को, जूते मारो सा**” अशा घोषणाही देण्यात आल्या.

दरम्यान या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सहभागी झाले आहेत. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात पोहचले असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी वाहनाचं सारथ्य सांभाळले.दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित आहेत.

दरम्यान आजच्या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, नवाब मलिक यांचा राजीनामा, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण,शेतकऱ्यांची वीजबील माफी अशा विविध मुद्यांवरून भाजप ठाकरे सरकारला घेरू शकते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!