नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकायांच्यात ४ मार्च पासून पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी खास सामना असणार आहे. त्याचा हा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने स्टेडीयममध्ये ५० टक्के प्रेक्षकांसाठी मान्यता दिली आहे.
परंतु सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली कोहलीच्या १०० व्या सामन्यासाठी उपस्थित राहणार का? दरम्यान मागील काही दिवसांत कोहली आणि बीसीसीआययांच्यात मतभेद झालेले सर्वांसमोर आले होते. त्यामुळे गांगुली या सामन्यासाठी उपस्थित राहणार का? यावर मोठी अपडेट आली आहे.
गांगुली सध्या आपल्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी लंडनला गेले आहेत. ते गुरुवारी चंदीगढ येथे पोहचणार आहेत. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. मीडीया रिपोर्टनुसार गांगुली मोहाली येथे होणाऱ्या कोहलीच्या १०० व्या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
जानेवारी महिन्यात कर्णधार पदावरून मोठा वाद सुरु होता. जेव्हा कोहलीने टी२० कर्णधारपद सोडले. त्यानंतर साउथ आफ्रिकेला जाण्याअगोदर त्याच्याकडून वनडे कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. यावर गांगुलीने सांगितले होते कि, त्याला कर्णधारपद सोडण्यास कोणीही सांगितले नव्हते.
महत्वाच्या बातम्या :


