Share

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिला सावध राहण्याचा सल्ला

Published On: 

नवी दिल्ली :  स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक असून ही देशातील सर्वाधिक विस्तार असलेली बॅंक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बॅंकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. तसेच बचतीच्या योजना राबविल्या जातात. गृह कर्जाच्या क्षेत्रातही ही बॅँक आघाडीवर आहे. नुकतेच एसबीआय बँकच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने ग्राहकांना फसवणूक करणार्‍यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणतीही संवेदनशील माहिती ऑनलाईन शेअर करू नका, कोणत्याही अज्ञात लिंकवरून कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करू नका, असे सांगण्यात आले आहे. जर असे केले नाही तर सायबर गुन्हेगारांकडून तुमची फसवणूक होऊ शकते.

याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करत सांगितले की, ‘आम्ही आमच्या ग्राहकांना सावध राहण्याचा आणि कोणतीही संवेदनशील माहिती ऑनलाईन शेअर करू नका असा सल्ला देतो.’

स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलेलेल्या काही सूचना –

  • आपला वैयक्तिक तसेच बँकिंग तपशील कोणत्याही अज्ञात व्यक्तीसह शेअर करू नका.
  • आपला OTP किंवा EMI, DBT, प्राइम केअर फंड किंवा इतर कोणत्याही केअर फंडासाठी बँक तपशील विचारणाऱ्या कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका.
  • SMS, ई-मेल, पत्रे, फोन कॉल किंवा जाहिरातींद्वारे लॉटरी, कॅश प्राईस किंवा नोकरीच्या संधी देतो असा दावा करणार्‍या फेक स्कीमपासून सावध रहा.
  • कृपया SBI च्या वेबसाइटवर केवळ संपर्क क्रमांक आणि SBI शी संबंधित इतर तपशीलांसाठी प्रवेश करा. या संदर्भात इंटरनेट सर्च रिझल्टवर उपलब्ध असलेल्या माहितीवर अवलंबून राहू नका
  • SBI प्रतिनिधी कधीही ईमेल किंवा SMS पाठवत नाहीत त्यामुळे ते ग्राहकांना त्यांची वैयक्तिक माहिती, पासवर्ड, हाय सिक्योरिटी पासवर्ड किंवा OTP विचारत नाहीत.
  • बँकेशी संबंधित तुमचा पासवर्ड वेळोवेळी बदलत रहा.
  • फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास लगेच तुमच्या जवळच्या SBI शाखेत तक्रार नोंदवा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!