बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शुक्रवारी बीड येथे जिल्ह्यात कोरोना परिस्थितीची पाहणी आणि खरीप हंगामाबाबत आढावा बैठकीसाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असताना कंत्राटी परिचारिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करत घोषणाबाजी केली.
यावेळी पोलिसांनी शंभरपेक्षा कंत्राटी नर्सना डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरात स्थानबद्ध केले. तसेच निवेदन देण्यासाठी आलेल्या काही परिचारिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे परिचारिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, अजित पवार हे बैठक आटोपून जात असताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमावावर लाठीचार्ज झाला.
मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यासाठी शेकडोच्या संख्येने विविध नागरिक जमा झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असताना कंत्राटी कर्मचारी आत जाण्यास इच्छूक होते. पण त्यांना जाऊ दिले नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार आणि राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निघताच त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. पण या कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेताच वाहनांचा ताफा पुढे निघाला. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. म्हणून पोलिसांना या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे सांगण्यात आले.
काय आहेत मागण्या?
शासनाने कोरोनाच्या काळात कंत्राटी पद्धतीने तात्पुरती सोय म्हणून तुटपुंज्या पगारात परिचारिकांची भरती केली. परंतु कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताच या परिचारिकांना काढले जाते, शासनाच्या नियमानुसार प्रत्येक परिचारिकेला पदोन्नतीचा हक्क आहे. परंतु त्याकडेही शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. केंद्र सरकारच्या परिचारिकांना कोविड भत्ता दिला जातो. परंतु राज्यातील परिचारिकांना हा भत्ता मिळत नाही. त्याचबरोबर कोरोना काळात सात दिवस काम आणि तीन दिवस सुटी द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी परिचारिका आक्रमक झाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुला प्रोटोकॉल कळतो का रे?’, अजित पवारांनी बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना झापले
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर
- नताशा, देवांगना, आसिफला मिळालेला जमीन सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा


