नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक असून ही देशातील सर्वाधिक विस्तार असलेली बॅंक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बॅंकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. तसेच बचतीच्या योजना राबविल्या जातात. गृह कर्जाच्या क्षेत्रातही ही बॅँक आघाडीवर आहे. नुकतेच एसबीआय बँकच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.
भारतीय स्टेट बँकच्या ग्राहकांसाठी १ जुलै २०२१ पासून बँक एटीएममधून रोख रक्कम काढणे आणि अन्य वित्तीय संस्थेच्या शाखेत चेक बुक देणे यात बदल केला आहे. तसेच चेक बुक संदर्भातील नियमही बदलण्यात आले आहेत. एसबीआयने हा बदल बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यावर (बीएसबीडी)वर लागू केला आहे. यामुळे आता एका महिन्यात केवळ चार व्यवहार विनामुल्य असतील, यामध्ये शाखा आणि एटीएममधून रोख रक्कम काढणे या दोन्ही गोष्टींचा समावेश असणार आहे.
काय आहेत बदल ?
- १ जुलै २०२१ पासून शाखा आणि एटीएम या दोन्हीमधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाईल.
- चार व्यवहार विनामूल्य असतील. यानंतर प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल.
- एसबीआय एटीएम व्यतिरिक्त इतर एटीएममधून रक्कम काढण्यासाठी हाच शुल्क लागू असेल.
- एसबीआय बीएसबीडी खातेदारांना १० पानांची चेकबुक विनामूल्य वापरण्याची परवानगी देणार.
- ज्येष्ठ नागरिकांना या चेकबुक वापर मर्यादेपासून सूट देण्यात आली आहे.
- चेकबुक अधिक घेण्यास किंवा अधिक पृष्ठांसह चेक बुक देण्यास शुल्क आकारले जाणार.
- जीएसटीसह ४० रुपये पुढील १० पानांच्या चेकबुकवर आकारले जातील.
- आपत्कालीन चेक बुकसाठी ७५ रुपये अधिक जीएसटी २५ पृष्ठांसाठी आणि ५० रुपये अधिक जीएसटी आकारला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘होय, मी गुन्हा केलाय..’, सुप्रीम कोर्टातील कथित ऑक्सिजन रिपोर्टवर केजरीवालांचा खुलासा
- ‘अस्तित्वात नसलेल्या अहवालावरून भाजपच्या केजरीवालांना विनाकारण शिव्या’
- ‘फटाके फुटायला सुरुवात झालीये, लिस्ट बरीच मोठी आहे!’
- ‘कलम ३७० आमची ओळख, त्यासाठी सदैव लढा देणार’ मेहबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया
- डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

