Share

पैठण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तातडीने डिसीएचसी सुविधा सुरु करा : मंत्री भूमरे

Published On: 

औरंगाबाद :  पैठण येथील घाटी अंतर्गत असलेल्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तातडीने कोरोना रुग्णांसाठी डिसीएचसी उपचार सुविधा सुरु करण्याचे आदेश रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी आज येथे दिले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे आदेश देण्यात आले आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात या संर्दभात घेतलेल्या बैठकीत भूमरे यांनी याबाबत आदेश दिले. भूमरे यांनी ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पैठण येथील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्याच ठिकाणी आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तातडीने कोरोना रुग्णांसाठी डिसीएचसीच्या माध्यमातून उत्तम उपचार सुविधा उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांची स्थानिक ठिकाणी सोय होईल असे या वेळी घेतलेल्या बैठकीत भूमरे यांनी सांगितले.

औरंगााबाद मधील वाढत्या रुग्ण संख्येच्या परिस्थितीत पैठण तालुक्यातील स्थानिक तसेच इतर रुग्णांसाठीही पर्यायी उपचार सुविधा तयार करण्यात येणार आहे. असे सांगूण पैठण येथे घाटीच्या अतंर्गत आरोग्य प्रशिक्षण केंद्रात ऑक्सिजनच्या तीस खाटांचे डिसीएचसी तातडीने सुरु करावेत. त्यासाठीचे आवश्यक असणारे मनुष्यबळ, इतर सुविधा देखील तत्परतेने उपलब्ध करुन देण्याचे आदेश देखील या वेळी भूमरे यांनी यावेळी बैठकीदरम्यान दिले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी तातडीने पैठण येथे प्रशिक्षण केंद्रात डिसीएचसी सुविधा तयार करण्यात येणार आहेत, तसेच मनुष्यबळासह सेंट्रल ऑक्सिजन व्यवस्था तसेच ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याचे या वेळी बैठकीदरम्यान सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या    

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!