Share

परभणी जिल्ह्यात ११ आरोग्य अधिकाऱ्यांचे पदे रिक्त, आरोग्य यंत्रणेवर पडतोय ताण

Published On: 

परभणी : कोराना रुग्णांचा वाढता कहर तसेच आरोग्य यंत्रणेवर पडणारा त्राण, अपुरे असणारे मनुष्यबळ असे असुन देखील पाथरी तालुक्यामध्ये ११ आरोग्य उपकेंद्रामधील ११ आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा फटका दररोज आरोग्य विभागाला तसेच कोराेना रुग्णांवर उपचार करताना पदोपदी जाणवत आहे.

राज्य सरकारने प्रत्येक आरोग्य उपकेंद्रासाठी सामुदायीक आरोग्य उपकेंद्रासाठी सामुदायीक आरोग्य अधिकारी हे पद निर्माण केले आहे. पाथरी तालुक्यातील बाभळ‌गाव, हदगाव, पाथरगव्हान (बु), वाघाळा हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्राअंतर्गंत २० आरोग्य केंद्राअंतर्गंत २० आरोग्य उपकेंद्र आहेत. सरकारने सामुदायीक आरोग्य अधिकारी पदे भरताना तालुक्यातील २० पैकी केवळ ९ उपकेंद्रामध्ये हे पदे भरलेली आहेत. तर उर्वरीत अकरा पद रिक्त ठेवण्यात आली आहेत.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. एकीकडे लसीकरणाची मोहिम देखील सुरु आहे. अश्या परिस्थितीत तब्बल ११ पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर पडू लागला आहे. तर हदगाव आणि वाघाळा येथे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले आहेत, मात्र त्यातील एक आरोग्य अधिकारी परभणी येथील कोविड सेंटरवर प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!