नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. भारतात दररोज आता 3 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. आतापर्यंत जगात इतके प्रकरण एका दिवसात आले नव्हते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज कोविडशी सामना करण्यासाठी काय काय करता येईल याबाबत बैठका घेत आहेत. दरम्यान, सोमवारी देशात कोविडची 3,52,991 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. यासह देशात संक्रमितांची संख्या 28,13,658 इतकी झाली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी मास्क ही एक ढाल बनले आहे. अनेक वैद्यकीय तज्ञ मास्क वापरण्याचा सल्ला नेहमी देत असतात आता अशा सूचना केंद्र सरकारने देखील केल्या आहेत. मात्र आता फक्त घराबाहेरच मास्क पुरेसं नाही तर घरातही मास्क लावायला हवं असा सल्ला केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी नीती आयोगाचे डॉ. व्ही. के. पॉल यांनी मास्क वापरण्यावर भर दिला.
‘आता घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे. घरात असतानाही मास्क वापरा. विशेषतः तुमच्या घरात कोरोना रुग्ण असेल तर त्या रुग्णासह घरातील इतर सदस्यांनीही मास्क घालायचा हवा’ असे नीती आयोगाचे डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लातूर जिल्ह्यातील अपंगांसाठीचे अनुदान अजूनही प्रतीक्षेत
- ‘वसुलीखोर अनिल देशमुखांनंतर आता वसुलीकांडाचे सूत्रधार अनिल परब यांचेही कांड बाहेर येणार’
- भंडारा घटनेनंतरही झोपलेले मनपा प्रशासन अखेर विरार घटनेनंतर झाले जागे! तात्काळ फायर ऑडिटचे आदेश
- नितीश कुमारांच्या बिहारमध्ये गुंडाराज, 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून शेतात फेकले !
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

