औरंगाबाद : गतवर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आर्थिक फेऱ्यामधून एसटी बाहेर पडत नाही तोच पुन्हा एकदा कडक निर्बंधांच्या आर्थिक चिखलात एसटीचे चाक अडकले आहे. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे एसटी प्रशासनावर मोठा परिणाम झाला होता. हजारो कोटींचा भुर्दंड एसटीला सहन करावा लागला होता. कोरोनाच्या अनुषंगाने सुरू केलेल्या लॉकडाउनमध्ये एसटीचे उत्पन्न कमालीचे घटले आहे.
कडक लॉकडाउनला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी जिल्हाभरात अवघ्या २८ बस धावल्या होत्या, शनिवारी १० तर तर रविवारी केवळ १३ बस धावल्या. येत्या काळात बसच्या फेर्या आणखी कमी होण्याची शक्यता एसटीच्या सुत्रांनी वर्तविली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने सध्या ब्रेक द चेनचे निर्बंध कडक लावले आहेत. अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे. त्यामुळे एसटीची बससेवाही सुरू आहे.
मात्र, लॉकडाउनमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. प्रवासी नसल्याने अनेक बस रद्द कराव्या लागत आहेत. गेल्या आठवड्यात ९० पर्यंत धावणार्या बसची संख्या अत्यंत कमी झाल्या आहेत. त्यामध्ये मध्यवर्ती बसस्थानकावरून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी कन्नड, वैजापूर आणि सिल्लोड येथे जाणार्या बसचा समावेश आहे. एसटीला दररोज साधारण २६० बसच्या माध्यमातून सरासरी ५० ते ५५ लाख रुपयांचे मिळणारे उत्पन्न शुक्रवारी अडीच ते तीन लाखांवर, शनिवारी एक लाखांवर तर रविवारी ३० ते ४० हजांरावर आले आहे.
पाच महिन्यांच्या खडतर लॉकडाऊन नंतर २० ऑगस्ट २०२० पासून एसटीची चाके रुळावर येण्यास सुरुवात झाली. मात्र सुरुवातीच्या काही दिवसात कोरोनाच्या भितीने प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. पाच महिन्यात झालेले आर्थिक नुकसान भरत होते. मात्र मार्च महिन्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली. शनिवार रविवार कडक लॉकडाऊन, अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आले. एसटी महामंडळावर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लातूर जिल्ह्यातील अपंगांसाठीचे अनुदान अजूनही प्रतीक्षेत
- ‘वसुलीखोर अनिल देशमुखांनंतर आता वसुलीकांडाचे सूत्रधार अनिल परब यांचेही कांड बाहेर येणार’
- भंडारा घटनेनंतरही झोपलेले मनपा प्रशासन अखेर विरार घटनेनंतर झाले जागे! तात्काळ फायर ऑडिटचे आदेश
- नितीश कुमारांच्या बिहारमध्ये गुंडाराज, 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून शेतात फेकले !
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार


