Share

आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी

Published On: 

मुंबई : आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली आहे. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत आणि भारतीय बाजारातील घडामोडी यामुळे धातू, बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधीत शेअरमध्ये तेजी दिसून आली. यात केवळ फार्मा क्षेत्राशी संबंधीत काही शेअरमध्ये थोडी घसरण दिसून आली आहे. मात्र, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे.

मुंबई शेअर बाजारात झालेल्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये १.०६ टक्क्यांची म्हणजेच ५०८.०६ अंकांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीसह सेन्सेक्स ४८,३८६.५१ या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १४३.६५ अंकाच्या वाढीसह १४,४८५ या पातळीवर बंद झाला.

देशात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत होता. मात्र, आता काही प्रमाणात शेअर बाजार पुन्हा सावरतांना दिसतोय. जागतिक पातळीवरुन मिळणारे सकारात्मक संकेत याचाही परिणाम गुंतवणूकदारांवर होतोय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!