Share

लोकसहभागातून चाकूर येथे शिवरस्ता तयार

Published On: 

लातूर: जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात लोकांच्या सहभागातून शिवरस्ता तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील कबनसांगवी -उजळंब शिवरस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता त्यामुळे शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता येथील ग्रामस्थांच्या सहभागातून शिवरस्ता तयार करण्यात आल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे.

तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या पुढाकारातून चाकूर-येरोळमोड जिल्हामार्ग रस्त्यापासून ते आटोळा शिवेपर्यंत तब्बल दोन किलोमीटर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. तसेच लोकसहभागातून वीस फुट रुंदीचा शिवरस्ता तयार करण्यात आल्याने शेतकऱ्यांची येण्या-जाण्यात होणारी अडचण कमी होणार असून तसेच शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करण्यात सोयीचे होणार आहे.

कबनसांगवी-उजळंब शिवरस्ता चाकूर-येरोळमोड जिल्हामार्ग रस्त्यापासून सुरू होवुन आटोळा शिवपर्यंत जातो. परंतु गेल्या अनेक पिढ्यांपासून रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी व शेतमाल घरी आणण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. खरीप हंगामातील पीकांची रास शिवारातील सर्व पीके निघाल्यानंतर रब्बी हंगाम संपल्यानंतर करावी लागत होती.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे शिवस्त्यावरील अतिक्रमण हटवुन रस्ता करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!