🕒 1 min read
मुंबई : भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा वैद्यकीय अहवाल ब्रीच कॅण्डी रूग्णालयातर्फे काही दिवसांपूर्वी हायकोर्टात सादर करण्यात आला होता. ते ८४ वर्षांचे होते. त्यांना ९ ऑक्टोबर २०२० रोजी रांची येथून अटक करण्यात आली होती.
स्टॅन स्वामी यांचा वैद्यकीय अहवाल रूग्णालयातर्फे उच्च न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर त्यांना ५ जुलैपर्यंत तेथेच ठेवण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. ४ जुलै रोजी सकाळी स्वामी यांना कार्डिअॅक अरेस्टमुळे व्हेंटिलेटर ठेवण्यात आले. तेव्हापासून ते बेशुद्ध होते. त्यानंतर दुपारी १.२४ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती हायकोर्टात देण्यात आली.
मुंबई हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर २ मे रोजी स्वामींना तळोजा मध्यवर्ती कारागृहातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. नुकत्याच कोरोनामधून बरे झालेल्या स्वामींची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना मुंबईच्या हॉली फॅमिली हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मात्र, त्यांची प्राणज्योत आज मालवली.
महत्वाच्या बातम्या
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव विधानसभेत मंजूर

