Share

औरंगाबादेत एसटीची गाडी रुळावर; आज धावल्या १०१ बसेस, १७१ कर्मचारी रुजू

Published On: 

औरंगाबाद : गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता हळूहळू मिटतांना दिसत आहे. औरंगाबाद विभागात आज एकूण १०१ बस धावल्या असून २४६ फेऱ्यांमधून ३०५८ प्रवाशांनी प्रवास केला. तर औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत १७१ कर्मचारी रुजू झाले असून यामध्ये १०४ चालक ५७ वाहकांचा समावेश आहे. जालना, बीड, मंठा, धुळे, नाशिक, पुणे यांसह अनेक नवीन मार्गांवर आज बस धावल्या. त्यामुळे आता हळूहळू एसटीची चाके रुळावर येत आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ७ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. राज्य शासनाकडून संप मिटवण्यासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. यामध्ये वेतन वाढ यांसह अनेक सुविधा कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांनी या सर्व आमिषांना बळी न पडता आपला लढा सुरूच ठेवला होता.

आता हा लढा न्यायालयात गेल्यानंतर हळूहळू कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडतांना दिसून येत आहे. औरंगाबाद विभागात आज एकूण ११० कर्मचारी रुजू झाले. याआधी ६१ कर्मचारी रुजू झालेले होते. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १७१ कर्मचारी रुजू झालेले आहेत. सुनावणीनंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ तर झालीच त्याशिवाय धावणाऱ्या बसेस आणि फेर्‍यांमध्येही वाढ झाली असून प्रवाशांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!