Share

समीर वानखेडेंच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत धक्कादायक माहिती समोर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जातीवरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता याचिकाकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकाराचा वापर करत समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत माहिती मागवली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणीच झाली नसल्याची शासनाच्या मुंबई जात पडताळणी समितीची माहिती अधिकार अंतर्गत धक्कादायक माहिती मिळाली आहे. नितीन यादव यांनी माहिती अधिकार वापरत जिल्हा जात प्रणाणपत्र पडताळणी समिती शहर कार्यलयाकडे समीर ज्ञानदेव वानखेडे या नावे देण्यात आलेले जात पडताळणी प्रमाणपत्र आणि सोबत त्या नावे जात पडताळणीसाठी जे कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. त्या सर्वांची साक्षांकीत प्रती मिळाव्यात, अशी मागणी नितीन यादव यांनी केली होती.

जिल्हा जात प्रणाणपत्र पडताळणी समिती मुंबई शहर कार्यलयाचा उपलब्ध अभिलेख तपासल्यानंतर समीर ज्ञानदेव वानखेडे या नावे जात पडताळणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे मुंबई शहर कार्यलयाकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!