Share

सचिन सावंतांनी शेअर केला मोदींचा लोकसभेतील ‘तो’ व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठा गदारोळ पाहायला मिळाला आहे. शिवसेनेचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. यावरुन सभागृहामध्ये मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाला. आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. त्यानंतर विधानसभेत एकच घोषणाबाजी सुरु झाली.

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तुंबळ खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यातील वीजजोडणी आणि कनेक्शन कापण्याच्या मुद्द्यावरून लक्षवेधी चर्चेदरम्यान ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी आधी पंतप्रधानांनी नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं वक्तव्य केले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नरेंद्र मोदी यांचा लोकसभा सभागृहातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी हातवारे करत बोलताना दिसत आहेत. ‘विधानसभेमध्ये अंगविक्षेप केला असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजप नेत्यांनी करुन हक्कभंग आणण्याची धमकी दिली. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत’, असे सचिन सावंत म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतल्यानंतर भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरून सभागृहात विरोधकांनी गोंधळ सुरू केला. देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी केल्यानंतर गोंधळ सुरू झाला. तेव्हा सभागृह काही काळ तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृह सुरू होताच भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागितली. मात्र, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी टोला लगवला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!