🕒 1 min read
परभणी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढलेला असताना देखील बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करणा-या जिंतूर आगाराला उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी एक लाख रुपयाचा दंड लावला आहे. ही दंडाची रक्कम २२ मार्च पर्यंत भरणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विहित कालावधीत दंडाचा भरणा न केल्यास संबंधीत आगार प्रमुखाविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात येवून संबंधिता विरूध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंद करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. गुरूवारी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सखाराम मांडवगडे, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी इंद्रजीत चाळगे यांच्यासह मंडख अधिकारी, तलाठी, तहसील कार्यालय, नगरपालिकेचे संयुक्त पथक विनामास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी जिंतूर शहरात फिरत होते.
यावेळी सप्तगिरी हॉटेल समोर परभणी – जालना – जिंतूर रोडवर लातूर – जिंतूर बस क्रमांक (एम.एच.20.बी.एल.1922)ची अधिकाऱ्यासह पथकाने तपासणी केली असता बसमध्ये ८१ प्रवाशी प्रवास करीत असल्याचे दिसले. बसमधील अनेक प्रवाशांनी मास्क बांधलेला नव्हता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने दोन प्रवासी मधील सामाजिक अंतर ठेवले नव्हते. बसमध्ये एक कुत्र्याच्या पिल्लास घेवून एक जण प्रवास करताना दिसले. या प्रकारामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणुच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयी निष्काळजीपणा केल्याचे पथकास दिसले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी पारधी यांनी जिंतूर आगार व्यवस्थापनास कोव्हीड – 19 उपाययोजना अंमलबजावणी बाबत निष्काळजीपणा केल्याचे दिसल्याच्या कारणावरून एक लाख रुपयांचा दंड लावला आहे. या दंडची रक्कम दि. २२ मार्च पर्यंत भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- थर्ड अंपायर कडून आणखी एक मोठी चूक; भारतीय संघाला भोगावे लागू शकतात वाईट परिणाम !
- इन फॉर्म ईशान किशनला संघातून डावलल्याने चाहत्यांमध्ये नाराजी; कारण आले समोर
- “वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, आता त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या”
- खळबळ! डी-मार्टचे सहा कर्मचारी पॉझिटिव्ह, मॉल पाच दिवसांसाठी सील
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’


