🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका सुरु आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील आज चौथा सामना खेळवला जात आहे. हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. २-१ अशी आघाडी इंग्लंडने घेतली आहे. त्यामुळे आज भारतीय संघासाठी करो या मरो अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, दुसऱ्या टी-२० सामन्यातून ईशान किशनने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पदापर्ण केलं होतं. याच सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत ३२ चेंडूंमध्ये ५६ धावांची खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने जिंकला देखील होता. तर, तिसऱ्या सामन्यात ईशानला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र, इन फॉर्म असलेल्या ईशानला चौथ्या सामन्यात संधी दिलेली नाही. दरम्यान, ईशान किशनला ग्रोईन इंज्युरी असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आल्याचं समजत आहे,
तर, पहिले तीन सामने खराब कामगिरी करणाऱ्या सलामीवीर के एल राहुलला मात्र संघात कायम ठेवण्यात आलं आहे. यामुळे क्रिकेट रसिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, भारताची पहिली फलंदाजी असून हा सामना जिंकणे भारतासाठी गरजेचं आहे.
भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत(यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि राहुल चाहर.
इंग्लंडचा संघ –
इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हिड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वुड.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शाळेत डान्सबार सुरू करण्याची परवानगी द्या’; संस्थाचालकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘साखर कारखान्यांवरील महिला अत्याचाराला वाचा फोड’, सिंधूताईंचा आ.धसांना सल्ला
- बीड जिल्हा नियोजन समितीच्या निवडीतून महिलांना वगळले
- मामाच्या घरी लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाली
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
