Share

खळबळ! डी-मार्टचे सहा कर्मचारी पॉझिटिव्ह, मॉल पाच दिवसांसाठी सील

Published On: 

🕒 1 min read

कल्याण : लॉकडाऊनच्या भीतीने मॉलमध्ये गर्दी होत आहे. किराना सामान तसेच इतर खरेदीसाठी नागरिक मॉलमध्ये धाव घेत आहेत. यावेळी नागरिकांचा निष्काळजीपणा समोर येताना दिसतोय. त्याचा परिणाम आता दिसत आहे. कल्याणच्या डि-मार्टमधील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. डी-मार्टीमधील कोरोना पॉझिटिव्ह आलेले कर्मचारी आतापर्यंत हजारो लोकांच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी डी-मार्टला गेलेल्या नागरिकांना प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर महापालिकेने डी-मार्ट पाच दिवसांसाठी सील केला आहे.

कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही दिवसात जवळपास ३ हजार रुग्ण वाढले आहेत. याच पाश्वभूमीवर महापालिकेकडून व्यापारी आणि दुकानदारांची अॅन्टीजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे. कल्याणच्या बैल बजार येथील गजबजलेल्या डी-मार्टच्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता ११० पैकी सहा कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे डी मार्ट पाच दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. तर अन्य कर्मचाऱ्याना क्वारंटाईन केले आहे.

लॉकडाऊन होईल या भीतीने दररोज शेकडो लोक तिथे प्रचंड गर्दी करायचे. पोलिसांकडून आणि महापालिका प्रशासनाकडून लोकांना समजवण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय डी-मार्टच्या प्रशासनालाही कडक ताकीद देण्यात आली होती. मात्र, अखेर ज्याची भीती होती ते घडलं. डी-मार्टच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय

दरम्यान, कल्याण डोंबिवली मनपा हद्दीत आज दिवसभरात ५६५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. कल्याणमधील कोरोनाबाधितांचा एकूण संख्या ही सध्या ६८,७०६ इतकी झालीये. यापैकी ६३,५८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या ३ हजार ८२६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत ११९१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!