Share

थर्ड अंपायर कडून आणखी एक मोठी चूक; भारतीय संघाला भोगावे लागू शकतात वाईट परिणाम !

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका सुरु आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील आज चौथा सामना खेळवला जात आहे. हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. २-१ अशी आघाडी इंग्लंडने घेतली आहे. त्यामुळे आज भारतीय संघासाठी करो या मरो अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मात्र, या अत्यन्त महत्वाच्या सामन्यात थर्ड अंपायरनी एक नाही तर दोन मोठे चुकीचे निर्णय घेतले आहेत. यामुळे भारतीय संघाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतासाठी फलंदाजी करण्यास सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच मैदानावर उतरला. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.

१३ व्या षटकात त्याने जोरदार फटका मारला, मात्र तो चेंडू इंग्लंडच्या खेळाडूकडे गेला. हा झेल नेमका खाली मैदानाला घासला कि खेळाडूने झेलला याबाबत पंचांना संभ्रम होता. हा निर्णय थर्ड अंपायर (तिसरे पंच) कडे गेला. त्यांनी देखील निर्णय घेण्यास बराच कालावधी घेतला. या खेळाडूचा हात मैदानावर घासताना चेंडू निसटल्याचे दिसून येत होते. मात्र थर्ड अंपायरनी सूर्यकुमारला बाद घोषित केले. यामुळे ३१ चेंडूत ५६ धावा करून त्याला माघारी फिरावं लागलं.

या चुकीच्या निर्णयावर क्रिकेट रसिकांसह माजी खेळाडूंनी देखील आक्षेप घेतला आहे. ट्विटरवर तिसरे पंच वीरेंद्र शर्मा यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. यानंतर, १९ व्या षटकात वाशिंग्टन सुंदरने देखील जोरदार फटका मारला. हा चेंडू बाउंड्री वर तैनात असलेल्या आदिल रशीद या खेळाडूकडे गेला. त्याने हा झेल घेतला, मात्र, त्याचा पाय बाउंड्री रेषेला टेकल्याचे स्पष्ट दिसत होते. यामुळे मैदानावरील अंपायरनी नॉट आउट असा आपला अंदाज देत थर्ड अंपायर कडून मदत मागितली.

यावेळी थर्ड अंपायर पुन्हा एकदा बराच काळ घेतला. यानंतर, या पंचाने वाशिंग्टन सुंदरला बाद घोषित केले. यामुळे, भारतीय संघासाठी महत्वाचा असलेला षटकार मिळाला नाही. यासोबतच, महत्वाचा खेळाडू बाद झाला, शिवाय एक चेंडू देखील वाया गेला. अन्यथा भारतीय संघाच्या धावा या १९० पार गेल्या असत्या. दरम्यान, इंग्लंडच्या संघाला विजयासाठी १८६ धावांची गरज असून थर्ड अंपायरचे हे दोन चुकीचे निर्णय भारतीय संघाला महागात पडू शकतात !

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!