मुंबई : अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आणि पोलीस दलातील फेरबदलानंतर राजकीय वातावरण शांत होईल, असं सरकार वाटत असलं तरी विरोधक मागे हटायला तयार नाहीत. सचिन वाझे आणि परमबीर सिंह ही केवळ प्यादी आहेत. त्यांचे राजकीय सूत्रधार कोण आहेत? याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच दिल्लीत केली आहे.
दरम्यान, ‘सचिन वाझेंनी तपासात एनआयएला जी माहिती दिली आहे त्यावरुन महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त परमबीर सिंह यांना बाजूला करुन हे प्रकरण संपणारं नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. सचिन वाझेंना प्लानिंग करण्यासाठी कोणी मदत केली हेदेखील लवकरच पुढे येईल,’ असं आमदार रवी राणा म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले, ‘ज्या प्रकारे हिरेन यांचा मृत्यू झाला त्यानुसार वाझे यांच्या जीवालाही धोका आहे. येणाऱ्या काळात मातोश्री अडचणीत येऊ शकते. त्यामुळं सचिन वाझेंच्या जीवाला धोका आहे. म्हणून मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे. एनआयएने पूर्ण लक्ष ठेवून सचिन वाझेंना संरक्षण दिलं पाहिजे,’ अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शाळेत डान्सबार सुरू करण्याची परवानगी द्या’; संस्थाचालकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- इन फॉर्म ईशान किशनला संघातून डावलल्याने चाहत्यांमध्ये नाराजी; कारण आले समोर
- बीड जिल्हा नियोजन समितीच्या निवडीतून महिलांना वगळले
- मामाच्या घरी लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाली
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
