🕒 1 min read
बीड : बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वारंवार आवाहन करूनही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र दिसत आहे. लग्नाला सध्या केवळ ५० नागरिकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पण तरीही याकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांनी बीडमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व प्रमुख यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत लग्नाला होत असलेल्या गर्दीवरून आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी विवाह सोहळ्यासाठी केवळ ५० जण असले पाहिजेत या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. तसेच विवाहासाठी कोण लोक येणार आहेत अशा ५० जणांची यादी आणि आधार कार्ड आधीच मागवून घ्यावेत असे निर्देश त्यांनी दिले.
त्यामुळे विवाह सोहळ्याचे आयोजन करताना संबधितांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका, ग्रामपंचायत अथवा पोलीस प्रशासनाकडे उपस्थित राहणाऱ्या ५० जणांची यादी आणि त्यांचे आधार कार्ड सादर करावे लागणार आहेत. प्रशासनातील अधिकारी अचानक कधीही विवाह सोहळ्याला जाऊन याची चौकशी करू शकतात. दिलेल्या माहितीशिवाय इतर लोक लग्नात आढळल्यास आयोजकांवर कारवाई होणारे.
दरम्यान, बैठकीत केद्रेकरांनी बीडच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, तुम्ही सगळे अधिकारी-कर्मचारी आताच सतर्क राहिला नाहीत तर बीड जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. त्यामुळे कारकुनी धंदे करू नका, कोरोनाचा मृत्युदर वाढला तर मी तुमच्यावर कारवाई करेन, अशा स्पष्ट शब्दांत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी संताप व्यक्त करत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- ‘वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन,’त्या’ व्यक्तीने दिले होते राम मंदिरासाठी १५ कोटी’
- महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
- राज्यात कोरोनाचे थैमान लवकरच लागणार कडक निर्बंध, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
- शिवसेनेच्या बाणाने भाजप घायाळ, जळगावात सत्ता हिसकावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
