🕒 1 min read
औरंगाबाद: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात संप सुरू आहे. आता मुंबई मंत्रालयावर एसटी कामगार मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी औरंगाबाद येथील एसटी कर्मचारी देखील निघाले आहेत. अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांना अडविण्यात आले. मात्र तरीही हे कर्मचारी मार्गक्रमण करत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेला एसटीचा संप अजुनही सुरूच आहे. हे आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारनं समिती स्थापन केली आहे. त्यानंतरही कामगार संघटना मागे हटायला तयार नाहीयेत.
शहरात ७ नोव्हेंबर रोजी सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप चार दिवस उलटल्यानंतरही कायम आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
मात्र या दरम्यान बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. खाजगी एजंटांचा यात मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाणार आहेत. या मोर्चामध्ये आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मंत्रालयावर धडकणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी औरंगाबादेतील पंचवीस ते तीस कर्मचारीदेखील निघाले आहेत. यात संदीप इंगळे, अमोल पितळे, गणेश धनावत, चंद्रकांत पवार, रमेश मिसाळ यांसह आदींचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दोन्ही राजेंची बिनविरोध निवड
- ‘आम्ही भडकवले तरी एसटी कर्मचारी मूर्ख नाहीत, ते न्याय हक्कासाठी लढत आहेत’
- एसटीचा संप संपेना! मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
- पडळकर आणि सदाभाऊ कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का?-अनिल परब


