Share

क्रिकेटनंतर बॉलीवुडमध्ये नवी इंनिग खेळण्यासाठी श्रीसंत सज्ज

Published On: 

मुंबई : 2013 साली आयपीएलमध्ये बेटिंगप्रकरणी श्रीसंतवर सात वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये लिलावासाठी नोंदणी केली होती. पण आयपीएल खेळण्याचं श्रीसंतचं स्वप्न भंगलं. आयपीएल संचालन परिषदेने खेळाडूंची संख्या कमी केल्यामुळे त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळली नाही.

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी बीसीसीआयनं २९२ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. १११४ खेळाडूंनी या मिनी लिलावासाठी नावं नोंदवलेली होती. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या अंतिम यादीतून एस श्रीसंतयाला वगळण्यात आलं होतं. यानंतर श्रीसंतनं नाराजी देखील व्यक्त केली होती.

दरम्यान श्रीसंत बाबत एक नवीन माहिती समोर येत आहे ती म्हणजे,  भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत आता बॉलीवूडमध्ये काम करणार असल्याचं समजत आहे. श्रीसंत आता क्रिकेटच्या मैदानातून थेट बॉलिवूडमध्ये आपली छाप उठवण्यासाठी जात आहे. एस श्रीसंत एका सिनेमात लीड रोल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बातमीमुळे क्रिकेटप्रेमींना खूप आनंद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!