कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पर्याय शोधून मराठा समाजाचे आरक्षण पूनरप्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारचीही आहे. या भुमिकेवर समाज ठाम असून या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना बोलते करण्याचे आंदोलन समाजाने छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात हाती घेतले आहे.
या आंदोलनाचे रणशिंग कोल्हापुरच्या ऐतिहासिक राजर्षी शाहू समाधी स्थळावरून उद्या १६ जुन रोजी फुंकले जात असून कोल्हापूर सह महाराष्ट्रातील जिल्ह्यामधूनही या आंदोलनाची मशाल धगधगणार आहे. कोल्हापुरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही आंदोलनाची मशाल जाणार आहे. नाशिक, संभाजी नगर, अमरावती, आणि कोकण असे पाहिल्या टप्प्यात आंदोलने होतील. दरम्यान, उद्याच्या आंदोलनाला येणाऱ्यांसाठी संभाजीराजेंनी काही सूचना केल्या आहेत.
काय आहेत सूचना ?
१६ जुन पासून मराठा क्रांती मूक आंदोलनाचे दुसरे पर्व राजर्षी शाहू समाधी स्थळ कोल्हापूर येथून प्रारंभ होत आहे,त्याची आचार संहिताही जाहीर करण्यात आली असून काळ्या रंगाची वेषभुषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून येणे. काळा मास्क वापरणे. (नो मास्क, नो एंट्री) असा गणवेश घालूनच मराठा आंदोलकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री, सॅनिटायझर सोबत ठेवून त्याचा वापर करणे, आंदोलन स्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन न करणे, कोरोनाचे नियम कसोशीने पाळणे अशी सक्त ताकीद समन्वयकांनी दिली आहे.
मराठा समाजाने यापूर्वी 58 मूक मोर्चा वेळी आपल्या वर्तनाने जगात आदर्श निर्माण केला होता. तोच आदर्श घेऊन यापुढेही वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे. मराठा समाज हा लढवय्या समाज आहे. परंतु आपली ती शक्ती विचारपूर्वक वापरणे काळाची गरज आहे, असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.
आंदोलनाची रूपरेषा –
स्थळ : राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, नर्सरी बाग, कोल्हापूर.
9:00 – पर्यंत महाराष्ट्रातील सर्व समन्वयकांनी आंदोलन स्थळी पोहचणे
9:50- समन्वयक, तरादुत, नोकर भरती ची मुले आणि लोकप्रतनिधींनी स्थानापन्न होणे..
10:00- छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यानंतर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात.
10:10- कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राजशिष्टाचार नुसार मनोगत किंवा आपापली जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात करतील.
1:00 – राष्ट्रगीताने मराठा क्रांती मूक आंदोलनाची सांगता.
1:15 – महाराष्ट्रातील समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांच्या सोबत लाँग मार्च संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक. श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती मार्गदर्शन करतील.
महत्वाच्या बातम्या
- पदं रिक्त पण शासन सुस्त ! प्रलंबित भरत्यांवरून भाजप युवा मोर्चाचे आक्रोश आंदोलन
- पुण्यात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ !
- …तर पुण्यात पुन्हा कडक निर्बंध; अजित पवारांची पुणेकरांना तंबी !
- अध्यक्षपदावरून हटवल्याने चिराग पासवान संतप्त, बंडखोर पाचही खासदारांना पक्षातून हाकलले
- ‘माझा यावर विश्वासच नाहीये की रामभक्त असे करू शकतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

