पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
कालपासून(१४ जून) शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. काल शहरात १८८ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती. तर, आज नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली आहे.
पुणे शहरात आज नव्याने २४६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७४ हजार ५४५ इतकी झाली आहे. तर, शहरातील ३५१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६३ हजार २८० झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या(ऍक्टिव्ह रुग्ण) २ हजार ७७३ रुग्णांपैकी ४८३ रुग्ण गंभीर तर ७३६ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने १० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पदं रिक्त पण शासन सुस्त ! प्रलंबित भरत्यांवरून भाजप युवा मोर्चाचे आक्रोश आंदोलन
- ‘शिवरायांचे नाव घेणारे ख्वाजा गरीब नवाजचा आग्रह करतायत’; भाजपची शिवसेनेवर टीका
- …तर पुण्यात पुन्हा कडक निर्बंध; अजित पवारांची पुणेकरांना तंबी !
- अध्यक्षपदावरून हटवल्याने चिराग पासवान संतप्त, बंडखोर पाचही खासदारांना पक्षातून हाकलले
- ‘मूक मोर्चाची मूका मोर्चा म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षाही नाही ‘
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
