Share

…तर पुण्यात पुन्हा कडक निर्बंध; अजित पवारांची पुणेकरांना तंबी !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.

कालपासून(१४ जून) शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. तर, पुणे शहराची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३ हजारांच्या आत आल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा देखील मिळत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील असा इशारा दिला आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीसाठी अजित पवार पुण्यात आले होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील अनलॉकबाबत देखील भाष्य केलं. कोरोना स्थिती आटोक्यात येत असतानाच हातावर पोट असलेल्यांची अडचण लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, रुग्णसंख्या पुन्हा वाढल्यास निर्बंध कडक करण्यात येतील असं अजित पवार म्हणाले.

‘गेली काही महिने लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणारे, छोटे- मोठे व्यावसायीक अडचणीत सापडले आहेत. त्यांना काही प्रमाणात मदत होते आहे. या परिस्थितीत अनलॉक करणे गरजेचे होते. कोरोना पॉझिटीव्ह रेट कमी झाल्याने पुण्यात अनलॉक करुन काही बाबतीतचे निर्णय शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, हा रेट पाच टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झाल्यास पुन्हा पुण्यातही कडक निर्बंध घालण्यात येतील,’ असं भाष्य अजित पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!