नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात लोनी येथे मशिदीत जात असलेल्या एका मुस्लीम वृद्धाला ५ जून रोजी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अब्दुल समद असे मारहाण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून हल्लेखोरांनी त्यांचे ऑटोरिक्षामधून अपहरण केले आणि जवळच्या जंगलातील झोपडीत नेऊन त्यांना मारहाण केली. हल्लेखोरांनी समद यांना ‘जय श्रीराम’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्याची बळजबरी करत, त्यांना हातांनी, काठीने मारहाण केली. समद हे पाकिस्तानी हेर असल्याचा आरोपही या हल्लेखोरांनी केला.
दरम्यान या प्रकरणावर राहुल गांधी यांनी भाष्य केले. राहुल यांनी ट्वीटरवर एक बातमी शेअर करत लिहिले की, ‘मी हे मानायला तयार नाही की श्रीराम यांचे खरे भक्त असे करु शकतात, अशी क्रौर्यता माणुसकीपासून दूर आहे आणि ती समाज आणि धर्म या दोघांसाठीही लाजिरवाणी आहे.’
https://twitter.com/RahulGandhi/status/1404753391750762496
प्रभू श्रीरामांच्या नावाखाली दिलेल्या हा धोका म्हणजे
राम मंदिर संस्थानाने मंदिरासाठी खरेदी केलेल्या जागेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपावर टीकेची तोफ डागली. प्रभू श्रीरामांच्या नावाखाली दिलेल्या हा धोका म्हणजे अन्याय आहे असं ते म्हणाले. राहुल गांधी यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रभू श्रीराम हे स्वतः न्याय, सत्य आणि विश्वासाचं प्रतिक आहेत. त्याच्या नावाखाली दिलेला हा धोका म्हणजे जणू पापच आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे तसंच त्यांनी मंदिरासाठी जमीन खरेदी करताना मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोपही केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुमच्या जीवावर राम मंदिराचे काम सुरू नाही, विश्वास नसेल तर देणगी परत घ्या’, भाजपने शिवसेनेला सुनावले
- ‘खंडणी मागणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे’; नितेश राणे कडाडले
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडचणीत! बदनामी प्रकरणी नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
- ‘महाविकास आघाडीचे यश भाजपच्या डोळ्यात खुपतेय’, अशोक चव्हाणांचा टोला
- राम जन्मभूमी खरेदीत हेराफेरीचा आरोप करणाऱ्या खासदाराच्या घरावर हल्ला


