पाटणा : बिहारमध्ये सध्या लोकजनशक्ती पार्टीत जोरदार घडामोडी सुरू असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली असून, आता चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही हटववण्यात आलं आहे. त्यामुळे चिराग पासवानसाठी या घडामोडी अतिशय धक्कादायक ठरत आहेत.
दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आल्यानं चिडलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोरी करणाऱ्या पाचही खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर चिराग पासवान यांना आता राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आल्यानंतर त्यांना विरोधी पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि लालू प्रसादर यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाकडून चिराग पासवान यांना पक्षात सामील करुन घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
चिराग पासवान यांच्या जागी सूरजभान यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. सूरजभान हे पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया संपन्न करतील. पाच दिवसांच्या आत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावून नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या अगोदर चिराग पासवान यांना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलं होतं. लोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशूपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत.
एनडीएची साथ सोडून तुम्ही आमच्यासोबत या आणि विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करा, अशी थेट ऑफर राजदकडून चिराग पासवान यांना देण्यात आली आहे. आता चिराग पासवान नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुमच्या जीवावर राम मंदिराचे काम सुरू नाही, विश्वास नसेल तर देणगी परत घ्या’, भाजपने शिवसेनेला सुनावले
- ‘खंडणी मागणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे’; नितेश राणे कडाडले
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडचणीत! बदनामी प्रकरणी नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
- ‘महाविकास आघाडीचे यश भाजपच्या डोळ्यात खुपतेय’, अशोक चव्हाणांचा टोला
- राम जन्मभूमी खरेदीत हेराफेरीचा आरोप करणाऱ्या खासदाराच्या घरावर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
