Share

पदं रिक्त पण शासन सुस्त ! प्रलंबित भरत्यांवरून भाजप युवा मोर्चाचे आक्रोश आंदोलन

Published On: 

धुळे : कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील महाभकास आघाडी सरकारच्या सर्वच सरकारी यंत्रणा ठप्प पडून आहेत. एकीकडे सर्वसामान्य माणूस कोरोनाच्या दयनीय परिस्थितीत होरपळला जात असतांना दुसरीकडे आपल्या राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक बेरोजगार युवा व इतर माध्यमातून रोजगारासाठी प्रयत्न करणारे अनेक तरूण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अंधःकारमय भविष्याचा अनुभव घेत आहेत.

भ्रष्टाचार व खंडणी गोळा करण्यात अव्वलस्थानी असलेल्या राज्य सरकारने कोरोना परिस्थितीचा हवाला देऊन आपली निष्क्रियता झाकण्यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या सर्व शासकीय व निमशासकीय नोकर भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवत व इतर अनेक भरती प्रक्रियांमध्ये घोळ व संभ्रमाची स्थिती निर्माण करून नोकर भरती प्रक्रिये बाबत आपले मनसुबे साध्य करून दाखवून दिले आहे. सरकारच्या या अत्यंत बेजबाबदार व आडमुठे धोरणामुळे राज्याच्या प्रगतीचा कणा असलेला राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व विद्यार्थी वर्ग प्रचंड निराशेच्या व अंधःकारमय चिंतेच्या खाईत लोटला गेला आहे.

या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच राज्यातील तरुण विद्यार्थी वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न राज्य सरकारसमोर ठामपणे लावून धरण्यासाठी दिनांक १५ जुन २०२१ रोजी भारतीय जनता युवा मोर्चा, धुळे महानगर जिल्हा तर्फे क्युमाईन क्लब जवळ भव्य आक्रोश धरणे आंदोलनाचे आयोजन केले गेले.

काय आहेत प्रमुख मागण्या ?

1) गृह विभागातील २४ हजार ५८१, सार्वजनिक आरोग्य विभागातील २० हजार ५४४, जलसंपदा विभागातील २० हजार ८७३अशी राज्यात किमान 2 लाखांहून पदे रिक्त आहेत. ही पदे ताबडतोब भरावी.

2)अत्यंत महत्वाची वैद्यकीय अधिकारी ते संचालकांपर्यंत 2683 पदे रिक्त असताना ती भरली जात नाहीत,फक्त वय वाढवून दिले जात आहे. ही पदे तातडीने भरावी.

3)MPSC च्या अनेक परीक्षा व निकाल 2019 पासून विविध कारणांमुळे रखडले आहेत ,शासनाने या परीक्षांची तारीख ताबडतोब घोषित करावी व निकालांचा मार्ग मोकळा करावा.

4) गट क व गट ड संवर्गातील ग्राम व जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या व इतर अशा जवळपास 72,000 रिक्त पदांची प्रलंबित असणारी मेगाभरती प्रक्रिया राबवणे.

भाजयुमो तर्फे केलेल्या वरील सर्व मागण्यांचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करून लवकरात लवकर नोकर भरती प्रक्रिया राबवावी व राज्यातील सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी ही राज्य सरकारला विनंती आहे. राज्य सरकारने तरुणांचा अंत न पाहता वरील सर्व भरती प्रक्रिया राबवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीस राज्य सरकार स्वतः जबाबदार असेल असा इशाराही भाजयुमो तर्फे देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!