परभणी : विदर्भात आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी रविवारी लेखी परीक्षा होत आहेत. त्यासाठी शनिवारी एसटी महामंडळाने विदर्भामध्ये परिक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र बस सोडली.
या परीक्षेस परभणी जिल्ह्यातील उमेदवार मुकू नये म्हणून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारांसाठी स्वतंत्र बसच्या व्यवस्थेची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भात निर्णय घेऊन एसटी महामंडळाला स्वतंत्र बस सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार परभणी आगारातून सकाळी तसेच सायंकाळच्या वेळी परिक्षार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडल्या असल्याची माहिती आगारप्रमुख दयानंद पाटील यांनी दिली.
रविवारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये उमेदवारांच्या परीक्षा होणार आहेत. याच प्रमाणे विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ व इतर जिल्ह्यामध्ये पण परीक्षा होत आहेत. परभणीतील उमेदवारांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आसन व्यवस्था ( परीक्षा केंद्र) केली आहे. एसटी महामंडळाने विदर्भात जाणाऱ्या बसेस शनिवारी पाठवाव्यात. तसेच परतीत रविवारी सायंकाळी परभणीकडे वापस आणाव्यात. यासाठी आपल्या स्तरावर परवानगी द्यावी. या प्रवासी वाहतुकीत आरोग्य विभागाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी या वेळी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांवर चाकूने प्राणघातक हल्ला करणारा गजाआड
- ‘यांच्या जागी तुमची मुले असती तर काय केले असते?’ जितेंद्र आव्हाडांचा सवाल
- सोमवारपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घ्या ; चंद्रकांत पाटीलांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या महिला वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची संघ निवड
- बनावट कागदपत्राआधारे आरटीओ कार्यालयाची फसवणूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

