मुंबई : टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दानशूरतेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या दातृत्वासाठीच त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच भारतरत्न देण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. तसेच सोशल मीडियावर त्यांना भारतरत्न देण्याची मागणी ट्रेंडिंगवर आहे. याच मागणीवर आता खुद्द रतन टाटा यांनी पूर्णविराम लगावला आहे. सोशल मीडियावरील मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून मला भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा अशी विनंती केली आहे.
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी सुरत येथे झाला. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल आणि आईचे नाव सोनू असे आहे. रतन टाटा हे दत्तकपुत्र आहेत. कंपनी, व्यवसायाबरोबरच समाजाच्या हिताचा सतत विचार करणं ही टाटा समूहाची खासियत आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात टाटा उद्योगसमूहाच्या ताज हॉटेलला लक्ष्य करण्यात आलं होतं.त्यावेळी या हॉटेलच्या कर्व्यमचार्वयांना तर त्स्थायांनी मदत केलीच पण या हॉटेलच्या परिसरातले जे जे जायबंदी झाले वा बळी पडले, त्या सगळ्यांच्या घरी जाऊन रतन टाटा यांनी त्यांना मदत केली. हे करायची त्यांना काहीच गरज नव्हती. आणि ते केलं नसतं तरी त्यांना कोणी काहीही म्हणालं नसतं. पण तरी त्यांनी ही मदत केली. वर्तमान काळात जर कुणाला दानशूर कर्णाची उपमा देणे योग्य राहील असा प्रश्न निर्माण झाला तर त्याचे एकच उत्तर असेल ते म्हणजे रतन टाटा.
एवढे मोठे व्यावसायिक आणि देशातील मोठे व्यापारी असतानाही रतन टाटा सामान्य माणसासारखं जीवन व्यतित करत आहेत. काम ही सर्वात मोठी पूजा असल्याचंही रतन टाटांचं म्हणणं आहे. जर आपण कोणतंही काम नियमांच्या अधीन राहून करत असल्यास आपल्यालाही यश मिळण्यास वेळ लागेल. पण यश मिळेलच याची निश्चित खात्री आहे.
टाटा ग्रुपचा व्यवसाय एवढा मोठा असूनही त्यांची कंपनी टाटा एक ट्रस्टसारखं काम करते. त्यामुळेच ती मुकेश अंबानी आणि दुसऱ्या श्रीमंतांच्या फोर्ब्स लिस्टमध्ये समाविष्ट नाही.रतन टाटा हे त्यांच्या दानशूर व्यक्तिमत्वामुळे कायमच चर्चेत असतात. कोरोना काळात देखील त्यांनी देशासाठी भरभरून मदत केली. देशाबद्दल जे जे काही करता येईल त्यासाठी ते पुढाकार घेत असतात.
नुकतेच रतन टाटा दोन वर्षांपासून अस्वस्थ असलेल्या एका माजी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी ८३ वर्षीय मुंबई ते पुणे प्रवास करून पुण्यातील फ्रेंड्स सोसायटीमध्ये आले होते. यावेळी त्यांच्यासोबत ना बाउन्सर होते ना सुरक्षारक्षक ना कसला ताफा ! अत्यंत साधेपणाने या माजी कर्मचाऱ्यांची त्यांनी भेट घेतली.या खासगी भेटीचा कोणत्याही प्रकारे प्रचार केला गेला नाही, आणि तेथे कोणतेही माध्यम नव्हते. मात्र तरीही त्यांच्या या भेटीचा एक फोटो व्हायरल झाला आणि सर्वच क्षेत्रातून पुन्हा एकदा टाटांचं कौतुक केलं गेलं.
रतन टाटा यांनी 21 वर्षांच्या करिअरमध्ये टाटा उद्योग समूहाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतल भारत सरकारने 2000 मध्ये त्यांना पद्भूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवलं आहे.टाटा सन्स आज अनेक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. टाटा समूहाच्या सर्व कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तत्पर व योग्य वर्तणूक देत असल्याचे अनेक वेळा दिसून आलं आहे.
कोरोना बाधितांसाठी तब्बल दीड हजार कोटी रुपयांची मदत त्यांनी केली होती त्यावेळी त्यांचे विशेष कौतुक झाले मात्र त्यांनी अश्याप्रकारे समाजाला मदत करण्याची हि काही पहिली वेळ नव्हती.यापूर्वी अनेकदा संकटकाळात देशाला समाजाला त्यांनी हजारो कोटींची मदत केली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून देखील मोठ्याप्रमाणावर गरिबांच्या हिताची कार्ये केली जात आहेत. आधुनिक भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक जडणघडणीत अनेकांचा मोठा वाटा आहे. राजकीय नेत्यांचा जसा देशाला दिशा देण्याचा वाटा महत्त्वाचा तसाच उद्योग उभारून देशाचं आर्थिक चक्र मजबूत करणाऱ्या उद्योगपतींचा वाटाही तितकाच मोठा असतो. श्रीमंतांच्या यादीत टाटा आहेत कि नाही यापेक्षा लोकांच्या मनात त्यांचे स्थान किती महत्वाचे आहे यावरून त्या व्यक्तीची किंमत व्हायला हवी. आपल्या सोबत काम करणाऱ्या सर्वांची तसेच देशातील प्रत्येक नागरिकाची काळजी करणाऱ्या लोकांच्या यादीत टाटा यांचे नाव सर्वात वर आहे.
महत्वाच्या बातम्या
-
काँग्रेस रक्ताने शेती करतंय, भाजप नव्हे; राज्यसभेत कृषिमंत्र्यांचा हल्लाबोल
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
