Share

काँग्रेस रक्ताने शेती करतंय, भाजप नव्हे; राज्यसभेत कृषिमंत्र्यांचा हल्लाबोल

Published On: 

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मागच्या अडीच महिन्यांपासून कृषी आंदोलनांवरून रणकंदन पेटलेलं आहे. मागच्या तीन दिवसांपासून संसदेतही यावर चर्चा सुरू आहे. शुक्रवारी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्यांवर बोलताना म्हटले की, शेती पाण्याने केली जाते, परंतु रक्ताने शेती करणे केवळ कॉंग्रेसच करू जाणे.

शेतकरी आंदोलनावर बोलताना तोमर म्हणाले की, शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सरकारवर बेछूट आरोप करत सुटला आहे. तीनही कायद्यांना काळे कायदे म्हणून संबोधले जाते आहे. परंतु या काय कायद्यांत नेमकं काय काळं आहे, हे ना शेतकरी नेते सांगताहेत ना विरोधक! शेतकऱ्यांच्या जमिनी जातील असा आरोप केला जातोय, परंतु आम्हाला कुणीही दाखवून द्यावे की, या कायद्यांमध्ये अशी कोणती तरतूद आहे, ज्यावरून शेतकऱ्यांच्या जमिनी जातील हे सिद्ध होते.

कृषिमंत्र्यांनी सांगितले की, केंद्राचा कायदा राज्य सरकारांचा कर रद्द करतो, परंतु राज्य सरकारांचे कायदे कर द्यायला भाग पाडतात. नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, जे कर वसूल करत आहेत त्यांच्याविरोधात आंदोलन केले पाहिजे, परंतु इथे उलटी गंगा वाहतेय. पंजाब सरकारच्या कायद्यात शेतकऱ्याला शिक्षेची तरतूद आहे, परंतु केंद्राच्या कायद्यात असे काहीही नाही.

कृषीमंत्री म्हणाले की, आम्ही शेतकरी संघटनांसोबत 12 वेळा बैठक घेतली, त्यांच्या विरोधात काहीही बोललो नाही आणि वारंवार विचारले की, तुम्हाला नेमका कोणता बदल हवा आहे ते सांगा. बदल करण्याचा अर्थ संपूर्ण कायद्याच चुकीचा आहे असा बिलकूल नाही.

राज्यसभेत तोमर म्हणाले की, केवळ एका राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे. शेती पाण्याने केली जाते, परंतु केवळ कॉंग्रेसच रक्ताने शेती करू शकते. केंद्राच्या कायद्यानुसार शेतकऱ्याला केव्हाही करार शेतीतून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान, कृषिमंत्र्यांचे भाषण सुरू होते तेव्हा विरोधकांनी मोठा गोंधळ केला. या गोंधळानंतर काँग्रेसनेही सरकारवर टीका करत हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांचे डेथ वॉरंट असल्याचे म्हटले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!