Share

Eknath Shinde : विधानसभेत कुटुंबाबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक; डोळ्यात पाणी आले

Published On: 

मुंबई : विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. तर आज शिंदे-भाजप सरकारने बहुमत जिंकलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

यानंतर सभागृहात बोलताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनेक मुद्दे उपस्थित केलं. तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्री भावुक देखील झाले. माझा श्रीकांत डॉक्टर झाला मात्र मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी उशिरा जायचो. त्याच आणि माझं टाईमिंग जुळत नव्हतं. मी संघटनेला वेळ दिला. मी शिवसैनिक हेच माझं कुटुंब मानलं. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला, असं ते बोलताना म्हणाले.

तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले कि, माझी दोन मुलं डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघे साहेबांनी आधार दिला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कुणासाठी जगायचं. माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता होती. दिघे साहेब पाच, सहावेळा माझ्या घरी आलं. मी संघटनेला न्याय देऊ शकत नाही म्हणून सांगितलं. तेव्हा दिघे साहेब म्हणाले तुला हे दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसावेच लागतील. मी दिघे साहेबांना देव मानतो, बाळासाहेब, दिघेसाहेब आमचे देव मानतो. असं बोलताना शिंदे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले, असं ते म्हणाले.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. चार लोकांच्या कंडोळ्यानं उद्धव साहेबांना बावळट केलं, चार मतं घ्यायची लायकी नाही याची आणि आम्हाला डुक्कर बोलतात. डुकरांची मत घेऊन तुम्ही निवडून आलात. हे कोण सहन करणार आहे. आम्हाला मंत्री केलं हे उपकार आहेत, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!