Share

 सोयगाव शहरासह तालुक्यात कडकडीत लॉकडाऊन

Published On: 

औरंगाबाद : प्रशासनातर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशाने दोन दिवस सोयगाव शहरासह तालुक्यात पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनला रविवारी ठिकठिकाणी कडकडीत प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान सोयगाव शहरासह तालुक्यात नगर पंचायत व महसूल विभागाने सलग दुस?्या दिवशीही पाठ फिरवल्याचे दिसून आले.

सोयगाव नगर पंचायत प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या लॉकडाऊन संबंधीच्या कार्यक्रमाची माहिती शहरातील जनतेपर्यंत पाहोचवली नव्हती. दरम्यान दुसऱ्या दिवशी सुंज्ञ ग्रामस्थ व व्यापा?्यांनी रविवारच्या लॉक डाऊनसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अत्यावश्यक सेवेतर्गत शहरासह ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकाने, किराणा दुकान, शिव भोजन, तसेच कृषी सेवा केंद्र सुरळीत सुरू होती.

या बंद दरम्यान सोयगाव महसूल प्रशासनासह सोयगाव नगर पंचायत प्रशासनाने कोणतीही भूमिका न घेतल्याने या दोन्ही विभागाचे कोणतेही अधिकारी कर्मचारी रस्त्यावर नहुते.
शनिवारच्या लॉकडाऊनसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सपोनि सुदाम शिरसाठ, पो उपनिरीक्षक गीते, पो.नाईक संतोष पाईकराव,दिलीप तडवी, पो हे कॉ पवार, पोलीस नाईक सागर गायकवाड, अविनाश बनसोड, चव्हाण, कोळी,शिंदे, तायडे, व दामधर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!