🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (bcci) आणि टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली यांच्यात सध्या मतभेद चालू असल्यचे दिसत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की, ‘मी वैयक्तिकरित्या कोहलीला टी-20 कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते. सौरव गांगुलीच्या या वक्तव्यावर विराट कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, याबाबत आमच्यात कोणत्याही प्रकारे बोलणे झाले नाही.
पत्रकार परिषदेत विराट कोहली म्हणाला, ‘जेव्हा मी बीसीसीआयला टी-20 कर्णधारपदाबद्दल सांगितले, तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही. टी-२० कर्णधारपद सोडू नका, असे कोणीही सांगितले नाही, असा खुलासाही कोहलीने केला. विराट कोहलीच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली होती, त्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची चौकशी करण्यात आली आणि त्याला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. मात्र अलीकडेच पत्रकारांनी सौरव गांगुलीला घेरले आणि विराट कोहलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला.
आपल्या कामासाठी निघालेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षांना पत्रकारांनी घेरले आणि त्यांना या प्रकरणी प्रश्न विचारला, ज्यावर त्यांनी सडेतोड उत्तर देऊन आपले उत्तर टाळले आहे. सौरव गांगुली म्हणाला, ‘मला या प्रकरणी कोणतेही वक्तव्य करायचे नाही. भारतीय क्रिकेट बोर्ड आपल्या पद्धतीने हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सौरव गांगुली बोर्डाच्या सर्वोच्च पदावर आहे पण तो हा वाद टाळताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार…’, अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आनंद
- धक्कादायक! सोनू सूदनं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केलेल्या महिला नेमबाज खेळाडूची आत्महत्या
- राजकीय बॅनरबाजीतून औरंगाबादचे विद्रुपीकरण; औरंगाबाद मनपाची थातूरमातूर कारवाई..!
- डेटा करण्यासाठी लागणारा निधी त्वरित देणार- अजित पवार
- बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले यश
- जैसी करनी वैसी भरनी! कोहलीच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांना झाली अनिल कुंबळेची आठवण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
