Share

राजकीय बॅनरबाजीतून औरंगाबादचे विद्रुपीकरण; औरंगाबाद मनपाची थातूरमातूर कारवाई..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे शुभेच्छा बॅनर्स तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा आदी प्रकारच्या अनधिकृत बॅनर्सवर कारवाई करण्यात आली. बुधवारपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र महानगरपालिकेच्या या कारवाईनंतर शहरातील अनधिकृत बॅनर्स संपलेले नाहीत. त्यामुळे मनपाची ही कारवाई नावालाच होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः विविध राजकीय पक्षांकडून शहराचे विद्रुपीकरण करणे सुरु आहे.

हर्सूल टी पॉइंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट, मकईगेट लगत असलेले अनधिकृतपणे लावण्यात आलेले एकूण १० बॅनर काढण्यात आले. नंतर या पथकाने लिटिल फ्लावर चौक, मिल कॉर्नर भडकल गेट, खडकेश्वर, बस स्टँड रोड, कार्तिकी हॉटेल, बाबा पेट्रोल पंप, सिल्लेखाना, लक्ष्मण चावडी, मोंढा, गांधीनगर परिसर मार्गे शहागंज, सिटी चौक या भागातील फलक काढले. सायंकाळी आंबेडकर नगर एन-७ परिसर, रेणुका माता मंदिर रोड या भागात लावण्यात आलेले अनधिकृत वाढदिवसाचे शुभेच्छा फलक काढण्यात आले.

यामध्ये काही फलक वाहतुकीला आणि नागरिकांना अडथळा ठरत होते. त्यांच्या विरुद्धही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १२५ बॅनर काढण्यात आले. ही कारवाई प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, वाॅर्ड अधिकारी सुरडकर यांच्यासोबत इमारत निरिक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे, मझहर अली यांनी कारवाईत सहभाग घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!