Share

धक्कादायक! सोनू सूदनं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केलेल्या महिला नेमबाज खेळाडूची आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : धनबादची रहिवासी राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियन कोनिका लायक  (Konika Layak) हिच्या मृत्यूचे वृत्त आले आहे. चॅम्पियन कोनिका लायक हिने कोलकाता येथील तिच्या वसतिगृहात आपल्या राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली आहे. कोनिका गेल्या तीन महिन्यांपासून कोलकात्यात राहून रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घेत होती. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच धनबादच्या धनसार येथे राहणारे तिचे कुटुंब कोलकाता येथे पोहोचले.

बुधवारी सकाळी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी धनबाद येथील कोनिकाच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्याचवेळी स्थानिक बाली पोलिस स्टेशनचे पथक पोहोचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली. सायंकाळी उशिरा कोनिकाचे आई-वडील धनसारहून कोलकाता येथे पोहोचले होते. या घटनेपासून कोनिकाच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट आहे. बुधवारी सकाळी कोनिकाच्या वसतिगृहातून कुटुंबीयांना फोन आला की, तुमच्या मुलीची तब्येत बिघडली आहे, तुम्ही लवकर पोहोचा. माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब पहाटेच कोलकात्याला रवाना झाले.

गेल्या तीन महिन्यांपासून ती कोलकाता येथील जयदीप कर्माकर शूटिंग अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होती. अकादमीचे मुख्य प्रशिक्षक मनोजित यांनी सांगितले की, कोनिका ही खूप मेहनती मुलगी होती. तीन महिन्यांत ती खूप शिकली होती, पण तीन-चार दिवस ती अकादमीत येत नव्हती. तिने असे पाऊल का उचलले हे समजण्यापलीकडे आहे.

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धांमध्ये झारखंडसाठी पदक जिंकणारी कोनिका लायक तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने सोनू सूदला आधुनिक रायफल खरेदी करण्यासाठी मदत मागणारे ट्विट केले होते. कोनिकाने सोनू सूदच्या मदतीने रायफलही खरेदी केली. जून महिन्यात सोनू सूदने सुमारे तीन लाख किंमतीची जर्मन रायफल पाठवली होती. सोनू सूदने कोलकाता येथील शूटिंग अकादमीमध्ये तिच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. रायफल पाठवल्यानंतर सोनू सूदने व्हिडिओ कॉल करून कोनिकाला मेहनत करण्याचा सल्ला दिला होता

महत्वाच्या बातम्या

.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!