Share

लवकरच मी फिल्डवर ॲक्टिव्ह होईन ; कोरोन संसर्गानंतर आदित्य ठाकरेंचा विश्वास

Published On: 

मुंबई : मुंबईतील वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना २० मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती तेव्हापासून आदित्य ठाकरे यांच्यावर उपचार सुरु होते. तर आदित्य ठाकरे यांची आई रश्मी ठाकरे यांनाही कोरोना झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, आता त्यांचा प्रकृतीही स्थिर आहे.

कोरोनावर मात करुन आदित्य ठाकरे यांनी कमबॅक केलं आहे. सध्याची वाढती कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पाहता वरळी मतदारसंघातील नेहरु सायन्स सेंटरमध्ये १५० बेड्स तर पोद्दार रुग्णालयात २२५ बेड्सचं अद्यावत सोयीसुविधा असलेलं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. या सेंटरचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं.

उद्घाटन प्रसंगी आदित्य ठाकरे सध्या सुरु असलेल्या राजकारणावर बोलायला विसरले नाहीत. ‘कोराना काळात जे राजकारण सुरु आहे, ते सुरु राहू द्या, त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. एवढंच नव्हे तर लसीवरुन जे काही सुरु आहे त्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही,’ असं वक्तव्य त्यांनी केलं. ‘लवकरच मी फिल्डवर ॲक्टिव्ह होईन,’ असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे हे अखेर कोरोनामुक्त झाले आहेत. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. यानंतर आदित्य ठाकरे पुन्हा कामालाही लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!